विजयकुमार गायकवाड
तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर :माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कर्जत तालुक्यातील खेड येथील ज्येष्ठ नेते नारायणराव देवराव मोरे पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. नारायणराव मोरे यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण कर्जत तालुक्यासह भिगवण परिसरात शोककळा पसरली होती. नारायण मोरे यांचा भिगवण परिसरात सातत्याने वावर होता. भाऊ त्याचप्रमाणे एन डी.पाटील या नावाने ते सर्व परिचित ओळखले जात होते. नारायणराव मोरे यांनी शैक्षणिक सामाजिक राजकीय सहकार आदी क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत विविध पदे भूषवली होती. १९८९ साली त्यांनी राशीन जिल्हा परिषद गटातून अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्यपद भूषवली होते त्याचप्रमाणे १९९१ मध्ये ते जगदंबा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन झाले होते भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेत त्यांनी काही वर्षे विश्वस्त म्हणून काम केले होते. तसेच गावचे पोलीस पाटील म्हणून काम करीत असताना त्यांनी आपल्या कार्याचा आगळावेगळा ठसा निर्माण केला होता भाऊंसोबत असलेल्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत माजी मंत्री पाटील यांनी भाऊंच्या कारकिर्दीचे कौतुक केले.’पुढे बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की,भाऊंबद्दल कायम आपुलकी असायची. माझं तुम्हाला आवर्जून सांगणं आहे की, भाऊंचा वारसा यापुढे कुटुंबीयांनी जपावा. भाऊ शेवटपर्यंत जे रुबाबात जीवन जगले असे जीवन आजच्या काळात कुणी जगणार नाही. कोणत्याही अडचणीला हाक द्या, मी कायम तुमच्या पाठीशी असेल’,असा त्यांनी यावेळी विश्वास दिला. यावेळी भिगवण गावचे माजी सरपंच पराग जाधव, इंदापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देहाडे, निमंत्रित प्रदेश भाजप सदस्य मारुती वणवे, सुनील काळे, निरगुडे गावचे उपसरपंच हनुमंत काजळे आदी उपस्थित होते.