बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
दौंड : दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रावणगाव ता.दौंड येथील श्री शिरसाई मंडळ आयोजित तिरुपती बालाजी दर्शन साठी आज पहाटे ४ वाजता २०१ भक्तांचा चा समूह रेल्वेने दौंड ते रेणिगुंठा असा रवाना झाला. श्री शिरसाई तरुण मंडळ गेली ५ वर्षापासुन हे कार्य करत आहे. या साठी कृषी उत्पन्न बाजार समिती चे मा. सभापती भगवान आटोळे,अरुण आटोळे, दिलीप आटोळे, दिनकर आटोळे, राजेंद्र आटोळे, दादा धायतोंडे, साईराम गाढवे,भाऊसाहेब आटोळे, कांतीलाल आटोळे,लक्ष्मण रांधवण, राजेंद्र गावडे संतोष आटोळे , दत्तु गावडे यांचे प्रयत्नांतून दर वर्षी तिरुपती बालाजी दर्शन हे आयोजित केले जाते. कृषी उत्पन्न बाजार समिती चे मा. सभापती भगवान आटोळे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सुरवात १० भविकांपासुन आज पर्यंत २०१ पर्यंत पोहचलो आहे.तिरुपती येथे जाऊन आलेनंतर अतिशय मानसिक समाधान मिळते, आर्थिक अडचणी दूर होतात,तिरुपती बालाजी येथे गेल्यानंतर गावाकडील घरची सुद्धा आठवण येत नाही. आणि मोठ्या ग्रुपने गेल्यामुळे अतिशय आनंद मिळतो.आणि येथुन पुढेही हे कार्य सदैव चालुच राहील आणि या साठी संयोजक तसेच मंडळाचे कार्यकर्ते यांचे मोठे योगदान आहे असे ते शेवटी म्हणाले.