सुधीर जाधव
जिल्हा प्रतिनिधी सातारा
सातारा : दि. 23 जांभे चिखली रस्त्यावर अति पावसामुळे दरड कोसळून रस्त्यावर मोठमोठे दगड मातीचा मलमा आल्यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. जांभे हे गाव सातारा शहरापासून साधारण 30 किलोमीटर अतिशय डोंगर दुर्गम भागात असून पर्यायी वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांची फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सातारा आगाराच्या काही बस ठराविक वेळेत चालू होत्या परंतु रस्ता बंद असल्यामुळे बस वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे. सातारा शहरात कामावर येणारे रोजचे प्रवासी, त्याचबरोबर शाळा, कॉलेजचे विद्यार्थी बस बंद असल्यामुळे यांचे फार नुकसान होत आहे. आजारी लोकांना सुद्धा औषध उपचारासाठी येणे अवघड झाले आहे. या अडचणी लक्षात घेऊन स्थानिक ग्रामस्थांनी, कोणत्याही प्रशासकीय मदतीची वाट न पाहता, सरपंच आनंद सप्रे, मा. सरपंच कोंडीबा कोंडे, ग्रा.पं. सदस्य प्रदीप कोंडे, नवनाथ सपकाळे, शिर्के, नारायण जांभे आणि चिखली या दोन्ही गावातील ग्रामस्थ या सर्वांनी मिळून, स्वतः श्रमदानातून मोठमोठे दगड रस्त्यावरून बाजूला काढून, रस्ता वाहने जाणे-येणे योग्य खुला करून, ग्रामपंचायतीच्या वतीने लोकांची गैरसोय टाळण्यासाठी, बस वाहतूक व्यवस्था सुरळीत होणे करीता, विनंतीपूर्वक सातारा आगाराला निवेदन दिले आहे.


