प्रकाश नाईक
तालुका प्रतिनिधी अक्कलकुवा
अक्कलकुवा : आज दि. 23 जुलै 2023 रोजी पुणे येथे झालेल्या रनिंग स्पर्धा मध्ये अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील असलेले काठी,
चापलाफळी येथील बलवंत बिज्या तडवी यांनी रनींग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहेत. त्यामुळे काठी गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त करून त्याच्या अभिनंदन करण्यात आला आहे. व त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत. आजचे तरुण व युवा वर्ग हे आपल्या भारत देशाचे विकास घडवणारे आहे त्यामुळे स्वतः ला कमी समजू नका स्वतः वर विश्वास ठेवा एक दिवशी तुम्ही पण नक्की यशस्वी होणार हे मात्र निश्चित आहेत. आता आदिवासी खेड्यापाड्यातील मुले सुद्धा शिक्षणात, क्रीडा, स्पर्धा परीक्षा, सरळसेवा, व इतर परीक्षा मध्ये सुद्धा यशस्वी होतांना दिसत आहे.काठी चापलफळी येथील बलवंत तडवी हा सर्व प्रकारच्या खेळात सहभाग होत आहे. शालेय, तालुका, प्रकल्प, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय खेळाडू आहेत. त्याला लहानपनापासूनच खेळाची आवड असलेला बलवंत तडवी आज आपल्या काठी गावाच्या व तालुकाचे, जिल्ह्याचेही नाव रोशन केले आहे. सन 2002 – 2003 मध्ये भांग्रापाणी येथे प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेत बलवंतने लांब उडी, उंच उडी, रनिंग, भालाफेक इ मध्ये आपला सहभाग नोंदवला आहेत.


