डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू: दि .24.सेलू तालुक्यातील डासाला येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी रायगड जिल्ह्यातील ईरशाळवाडी येथे दरड कोसळून जीवित व वित्तहानी झाली. या दुर्घटनेत कित्येक कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. बऱ्याच लोकांना अन्न ,वस्त्र, निवारा राहिला नाही. अशा लोकांना मदत करण्यासाठी जि.प.कें. प्रा.शाळा डासाळा येथील मुख्याध्यापक मधुकर काष्टे सर यांनी मदत निधी जमा करण्यासाठी पुढाकार घेतला. या सत्कार्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या खाऊचे पैसे ईरशाळवाडी येथील दरडग्रस्तांना मदत करावी म्हणून आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी स्वखुशीने आनंदाने आपल्या रोजच्या खाऊतील पैसे जमा करून दिले .तसेच गावातील सुजान ग्रामस्थांनी व शिक्षकांनी यासाठी आपली सवेंदना दाखवून आर्थिक मदत केली. या वेळी ३०३९ रुपये जमा झाले. वरील मदत मुख्यमंत्री साह्यता निधी म्हणून पाठवण्यात येणार.त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे.