डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : ता.24
येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे माजी चिटणीस प्राचार्य द.रा.कुलकर्णी लिखित ‘ निमित्त ‘ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी, ३० जुलै रोजी होत आहे.
नूतन विद्यालयाच्या राजेंद्र ब.गिल्डा सभागृहात सकाळी अकरा वाजता हा समारंभ आहे.अध्यक्ष स्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.प्रभाकर देव,जेष्ठ साहित्यिक तथा पत्रकार डॉ. आसाराम लोमटे आदी उपस्थित राहणार आहेत. नूतन विद्यालय शिक्षण संस्था आणि सन्मित्र प्रकाशन समिती यांच्या वतीने आयोजित सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, चिटणीस डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, संयोजक माजी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी,सहसंयोजक अशोक लिंबेकर, अजित मंडलिक यांनी केले आहे.