अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड: काल उमरखेड तालुक्यात चातारी या ठिकाणी ढग फुटिसदृश्य पाऊस झाला. या पावसाचे पाणी घरात शिरून आर्थिक हानी होऊन जीवनमान विस्कळीत झाले होते. या सर्व परिस्थितीला कारणीभूत असणारा रस्ता लगतच्या नाली हा पावसाळा आधी ग्रामपंचायत ने साफ केल्या नसल्यामुळे सदर परिस्थिती उद्भवली सदर परिस्थितीची माहिती चातारा येथील कार्यकर्त्यांनी उमरखेड शहर प्रमुख राहुल मोहितवार यांना दिली असता तात्काळ त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख सय्यद माजिद, उपतालुका प्रमुख गोपाल भाऊ झाडे, शहर संघटक श्याम चेके, शहर उपप्रमुख शैलेश मेंढे यांच्या सह गाव गाठून संपूर्ण गावकऱ्यांची अडचण जाणुन घेतली असता . सदर नाल्याची जोपर्यंत साफ सफाई करून खोलीकरण ,रुंदीकरण होऊन गावात येणारे पाणी दुसरीकडे वळवण्यात येणार नाही. तोपर्यंत प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते गाव न सोडण्याची भूमिका घेत ग्रामपंचायत चातारी या ठिकाणी ठाण मांडुन बसले होते. चातारि येथील परिस्थितीची तीव्रता पाहत बघता पोलीस प्रशासन, पंचायत समिती प्रशासकीय अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल होत सदर परिस्थितीचा आढावा घेऊन तात्काळ ग्रामपंचायत ग्रामसेवक यांना सदर नाल्याचे बंदीकरण करून खोलीकरण करून साफ करण्याचे आदेश देत सदर पाणी दुसरीकडे वळवण्यात आले. त्यामुळे चातारी ग्रामवासी यांच्या मदतीला धावून आलेल्या सर्व प्रहार कार्यकर्त्यांचे चातारी ग्रामवास यांनी आभार मानले.
यावेळी चातारी येथिल जनशक्ती पक्षाचे उमरखेड महागाव विधानसभा प्रमुख बंडुभाऊ हामंत, शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष अनिल माने, आशिष हामंद, बालाजी माने, नागेश शिंदे, राम हामंत ,शिवाजी कलाने, नारायण भवर व त्रस्त गावकरी सुदर्शन पसलवाड, बाळू पिनलवाड, अमोल माने, आदिनाथ पिनलवाड, बालाजी भवर, बालाजी हामंद व इतर ही प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


