सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
सुकळी (ज.)सतत चार दिवस झालेल्या सतत धार पावसामुळे तालुक्यातील सुकळी जहागीर येथील पूल पुरामुळे तुटण्याच्या मार्गावर आहे वडाच्या नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेतीत पाणी घुसल्याने अनेकांच्या जमिनी खरडून गेले आहेत पुलाच्या दोन्ही भागाचा भराव वाहून गेल्याने फुल तुटून जाण्याच्या मार्गावर आला आहे. सुकळी जहागीर येथील पूल कोसळून जीवित हानी झाल्याचे किंवा काही नुकसान झाल्यास गौण खनिज अधिकारी यांच्यावर सर्व जबाबदारी टाकण्यात यावी चिल्ली जहागीर येथील गिट्टी क्रेशर खदानावाल्याने प्रस्ताविक रस्ता चिल्ली ज. येथून असून काही चेरी मिरी घेऊन सुकळी ज. येथून खुलेआम वाहतूक करण्यास महसूल प्रशासनाने परवानगी का देण्यात आली. सुकळीज. नागरिक गावकरी प्रतिष्ठित कार्यकर्त्यांनी तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही खदान वाल्यांना सुकळी जागीर इथून वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्यात आली नाही तर काही नुकसान व पूल कोसळून पडल्यास महसूल प्रशासन जबाबदार राहील याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण लक्ष केंद्रित करावे. सुकळी येथील नागरिकांना संताप आंदोलन गावकरीचा करण्यात येणार आहे. सुकळी जहागीर.येथील गावकऱ्यांची मागणी आहे.