अनंत कराड
शहर प्रतिनिधी पाथर्डी
मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचे पक्ष बांधण्यासाठी महाराष्ट्रभर दौरा चालू असून अहमदनगर येथे विद्यार्थ्यांच्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी संदर्भात अहमदनगर येथे चर्चा करण्यात आली यावेळी मनसे परीवहनचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी अमितजी ठाकरे यांची भेट घेऊन ग्रामपंचायत येणाऱ्या काळातील पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका या निवडणूक याविषयी चर्चा केली व अमित जी ठाकरे यांनी त्यांना शब्द दिला तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत यावेळी मनसेचे पाथर्डी तालुका अध्यक्ष संतोष जिरेसाळ उपस्थित होते.