दशरथ गायकवाड़
तालुका प्रतिनिधी, मेहकर
मेहकर : संत गजानन महाराजांची पालखी देऊळगाव साखरशा नगरीत पोहोचताच देऊळगाव साखरशा नगराचे पोलीस पाटील श्री . गजानन पाचपोर. सोबतच तंटामुक्ती अध्यक्ष. बी. यम. राठोड. देऊळगाव साखरशा नगराचे प्रथम नागरिक श्री. संदीप भाऊ आल्हाट. व बुलढाणा जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रमोद बापू देशमुख. व आमचे तालुका प्रतिनिधी दशरथ गायकवाड. यांनी सर्वांनी संत गजानन महाराजांचे पूजन करून हर्ष उल्हास साथ स्वागत केले.श्रीच्या पालखीचे वैशिष्ट्य म्हणजे शिस्तबद्ध नियोजन.त्यांची शिस्त उखाण्याजोगी होती.पालखीच्या
सर्वात समोर अश्व रूढ पताकाधारी सेवाधारी नंतर टाळकरी सेवाधारी नंतर संत गजानन महाराजांची अप्रतिम मूर्ती रथामध्ये होती सोबतच चोख बंदोबस्त जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार मानकर साहेब यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता.महाराजांच्या भक्तांना भाग्यलक्ष्मी हार्डवेअर च्या दुकानासमोर अल्पोपहार वाटण्यात आला व चहा फराळ देण्यात आले आणि पुढच्या मुक्कामी जाण्यास स्त्रीच्या पालखीला रवाना केले.यावेळी परिसरातील भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.स्व.आनंदरावबापु पतसंस्था देशमुख,बुलढाणा अर्बन बँक,नवदुर्गा उत्सव मंडळ व गावातील नागरिक यांच्या वतीने नाष्टा,बिस्कीट व चहा पाणी देण्यात आले.सोबतच खेळण्या वाले मुलांना आनंद देण्या गुंग झाले होतेसोबतच नवल राठोड. निसार पटेल,जयसिंग चव्हाण, अनिल मंजुळकर ही सर्व पत्रकार मंडळी हजर होती.


