डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : दि.21 जुलै जिल्हा प्राथमिक शाळा हादगाव (पावडे) येथे तुळजाभवानी अर्बन सोसायटीच्या वतीने इयत्ता 1 पहिली च्या सर्व विध्यार्द्याना वेलकम शालेय साहित्य किट देण्यात आले,त्यामध्ये स्कूल बॅग ,पेन्सिल नोटबुक ,शॉपनर,खोटंरबल, ,बालमित्र पुस्तक,वाटप करण्यात आले. त्यावेळी उपस्थित सेलू शाखा व्यवस्थापक बाळासाहेब आनभुले साहेब, काठोळे साहेब मोरे साहेब, गोरे साहेब संजय भंडारी साहेब व दिपक चरडकर आदींचा गावातील सरपंच अनंता पावडे शालेय शिक्षण समिती चे अध्यक्ष रामेश्वर पावडे आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला.या वेळी गावचे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष रामेश्वर पावडे , सरपंच अनंता पावडे मुख्याध्यापक इंगळे सर व नारायण आरडे, दत्ता उगले, बाबासाहेब पावडे गावातील शेतकरी प्रतिष्ठित मान्यवर, शिक्षक , तसेच खातेदार व विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.


