वैभव गुजरकर
ग्रामीण प्रतिनिधी अकोट
सावरा:- परिसरात या वर्षी जवळपास पावसाचा दीड महिना होऊनही पाऊस रिमझिम होत आहे यामुळे पेरणी तर साधली पण अपुऱ्या पावसामुळे बाल रोपांवर वाणी व उंदीर खाद करत आहेत त्याच प्रमाणे वन्य प्राणी सुद्धा पीक फस्त करत असून शेतकरी संकटात सापडला आहे.या परिसरात असेगाव,देऊळगाव,वडाळी, मंचनपूर,रंभापुर ही गावे असून वन्य प्राण्याचं मोठया प्रमाणात वावर आहे या मध्ये हरीण,रान डुक्कर,रोही,माकडे असून हरणाचा शंभर ते दीडशे चा कळपा ने फिरत असून सोयाबीन व कपाशी मोठया प्रमाणात फस्त करत आहेत.
यावर वन विभागाने नियंत्रण आणावे किंवा शिकारीला परवनगी दयावी तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई सुद्धा दयावी अशी परीसरातील शेतकऱ्यांनची मागणी आहे.बी बियाणे व मशागत ,मजुरी चे दर मोठया प्रमाणात वाढले आहेत. रात्र दिवस मेहनत करून पीक उभे करावे व या वन्य प्राणी घशात घालत. असून शेतकरी मेटाकुटीस आले आहेत तेव्हा शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष वेधून यावर काहीतरी उपाय करावा व जगाचा पोशिंदा समाज नाऱ्या शेतकऱ्यांला या संकटातून मुक्त करावे