शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी,नांदुरा
नांदुराः विधान सभेच्या पावसाळी अधिवेशनात आज दि १९जुलै रोजी आमदार राजेश एकडे यांनी मलकापूर मतदारसंघात दि १८जुलै च्या रात्रीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीची झालेले अतोनात नुकसान तसेच रेल्वे च्या कामामुळे तसेच हायवेच्या अर्धवट कामामुळे अतीवृष्टी चे गावात घुसलेले पाणी ,पुरामुळे तीन नागरिकांनी गमावलेला प्राण या बाबत पॉईन्ट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून आपल्या मतदार संघातील परीस्थिती विशद करून राज्य शासनाने याबाबत तातडीने मदत जाहीर करून तसेच सरकारी यंत्रणाना निर्देश देण्याची मागणी केली यावेळी विधानसभेत बोलतांना आ एकडे यांनी मलकापूर मतदारसंघात १८जुलै च्या रात्रीपासून अतिवृष्टी सुरु आहे प्रचंड प्रमाणात कोसळत असलेल्या पावसाने नांदुरा व मलकापूर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेलाअसून अनेक गावांमध्ये पाणी घुसलेले आहे ,तसेच तिन लोक मरण पावलेली आहेत असंख्य गुरेढोरे वाहून गेलेली आहेत या पुरपरिस्थीतीला मुख्य कारणीभूत आहेत रेल्वेची सुरु असलेली कामे तसेच राष्ट्रीय महामार्गाने केलेली अपूर्ण कामे आहेत या दोन्ही यंत्रणांनी वेळेत काम न केल्यामुळे हे पाणी गावांमध्ये ,वस्त्यांमध्ये शिरत आहे
त्यामुळे शासनाने तात्काळ शासकीय यंत्रणांना निर्देश देऊन पुरामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याबाबत सांगावे तसेच अतिवृष्टी मुळे शेतजमीनीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पुरपीडीतांना व शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली .मतदारसंघातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये प्रशासनासह मी स्वत सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे असे यावेळी सांगितले.