शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी,नांदुरा
बाकीचे मोर्चे हे होयबा-तोयबा करणाऱ्यांचे व बेगडी असतात. जनसामान्यांच्या हक्काचा त्यात सहसा लवलेश नसतो. पण येथे तसे नाही. जेव्हा- जेव्हा जनसामान्य माणुस हतबल झालाय, तेव्हा- तेव्हा त्यांना न्याय देण्यासाठी या राज्यात फक्त एकच असा नेता आहे की, ते आंबेडकरी चळवळीशी निष्ठावान राहून आहेत, बाकीचे सर्व गल्ला भरू आहेत. ते नेते म्हणजे महासुर्याचा तेज, आदरणीय, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर.इतर सर्व पक्षीय राजकीय नेते हे आपापली खुर्ची वाचवण्यासाठी धडपडत असतांना वंचित फक्त असा पक्ष आहे जो लोकांसाठी रस्त्यावर आलाय.हे आता लोकांना सुद्धा कळू लागलेय की, आपला तारण हार जर कोणी असेल तर वंचितच. एक गोष्ट मात्र खरी आहे, राज्यात वंचित बहुजन आघाडीला भरपूर जनाधार मिळतोय हे बघून जे आधीचे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांचे धाबे आतून दणाणले आहे.पण,सांगतील कोणाला त्यात आपल्यातल्या गद्दारांची तर भविष्यात खूप गोची होणार आहे हे त्यांनी नमूद करून ठेवा वाटल्यास कारण, आंबेडकरी समाज आता स्वतःला आबेडकरवादी म्हणवून घेणारे नेते पण, प्रत्यक्षात मात्र आंबेडकरी चळवळीला सबल विरोध करणारे किंवा नामशेष करू पाहणारे जे राजकीय पक्ष आहेत त्यांची गुलामी करतात. असल्या नेत्यांना देखील येत्या निवडणूकी मध्ये लोकं त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहेत.


