अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने समान नागरी कायद्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार यांना एक लेखी निवेदन देऊन, या समान नागरी कायद्याचा निषेध करून, आदिवासी समाजाच्या विरोधात तयार करण्यात येत असलेले कायदे रद्द करा,अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रीय आदिवासी एकता अंतर्गत निवेदन देण्यात आले.यामध्ये अखिल भारतीय आदिवासी संघटना बिरसा दल क्रांती, या संघटनेस राष्ट्रीय आदेश एकता परिषद ला पाठिंबा आहे. तहसीलदार यांना निवेदन देतांना बाबाराव साखरे, प्रदेश प्रतिनिधी आदिवासी विकास परिषद, गोपाल लोखंडे तालुकाध्यक्ष, सुधाकर शिंदे शहराध्यक्ष, विष्णू उर्फ राणा डाबेराव, प्रशांत ऊपरवट, प्रवीण वानखडे, नवनाथ पवार, दीपक डाखोरे, संतोष डाखोरे, देवनंदन राक्षे, गोपाल जाधव, प्रकाश पाखरे, महादेव झ्याटे, राजू आगलावे, विश्वनाथ देवकर, शंकर ससाणे, बबन लोखंडे, बळीराम लोखंडे, रमेश धंदरे, देवानंद चौरे, गजानन गोरे, वासुदेव डाखोरे, देवराव देवकर, देविदास पांडे, दामोदर जटाळे, संतोष गिरे,आकाश गिरे, भगवान करवते, दसरत शिंदे, लक्ष्मण डाखोरे, राजेश भोकरे, प्रमोद ठाकरे, मनोहर शिंदे,प्रकाश चौरे, प्रकाश डाखोरे,अर्चना सुधाकर शिंदे सरपंच शिर्ला, देवका प्रकाश डाखोरे, निशा गोपाल लोखंडे,भारत अंभोरे, आकाश शिंदे, सुभाष खिल्लारे, रोशन डाखोरे, दशरथ मेटांगे, प्रदीप डाखोरे,आकाश करवते, अजय राव आदींचा समावेश होता.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)