माबुद खान
तालुका प्रतिनिधी जिंतूर
जिंतूर तालुक्यातील मागासवर्गीय भुमीहीन गायराण धारक यांच्या पिकाचा तात्काळ पंचनामा करून ७/१२ उतारा नावे करा,रमाई घरकुल योजना धारक, पंतप्रधान घरकुल आवास योजनेंतर्गत घरकुल धारक,आदी घरकुल धारकांना रेती उपलब्ध करून देण्यात यावी,श्रावण बाळ, निराधार,अपंग,विधवा महिलांसाठी,ज्या नवीन लाभधारकांनी प्रस्ताव सादर केले आहेत त्यांची तात्काळ बैठक घेऊन प्रस्ताव निकाली काढावेत, सामाजिक वनीकरण विभाग अकोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका येथे मागासवर्गीय भुमीहीन ,जाॅब कार्ड नोंदणी धारक यांना दररोज काम देण्यात यावे,सी एस सी केंद्र व महा ई सेवा केंद्र ज्या ज्या गावांमध्ये दिले आहेत त्या गावातच चालु करण्याची गरज असुन बरेच सीएससी केंद्र व महाईसेवा केंद्र धारक हे जिंतूर शहरात स्थायिक झाले आहेत त्यामुळे शाळेतील विद्यार्थी, शेतकरी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे म्हणून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ दुष्काळ अनुदान वाटप करावे, तालुक्यातील शेतकऱ्यांना बॅंकेकडून पिककर्ज तात्काळ वाटप करणे बाबत.व आतापर्यंत किती शेतकऱ्यांना पिककर्ज योजनेंतर्गत पिक कर्ज वाटप झाले आहे याचा अहवाल मागवावा,अवैध गौण खनिज उत्खनन साखरतळा रोड वरील शासकीय भूखंडावरील (माळरान) ,नेमगिरी परिसर वरील शासकीय भूखंडावरील (माळरान),एम आय डी सी कडील शासकीय भूखंडावरील माळरान आदी ठिकाणी होत असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन वर तात्काळ कारवाई करावी,जिंतुर शहरासह ग्रामीण भागातील अवैध गुटखा,मटका, जुगार,दारु विक्री व अवैध धंद्यावाल्यावर तात्काळ कारवाई करावी,जिंतुर तालुक्यात अवैधरित्या वाळू साठा जप्त करण्यात आलेला वाळू साठा लिलाव न करता घरकुल धारकांना देण्यात यावी, शहरासह तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करावेत अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिंतूर तहसील दारांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.