सुधीर जाधव
जिल्हा प्रतिनिधी सातारा
सातारा : आंबवडे बु. येथील वैद्य युवराज जाधव यांचा प्रियोग इंटरनॅशनल अल्टरनेटिव्ह थेरपी इन्स्टिट्यूट, पुणे. यांच्यावतीने दिला जाणारा ‘अॅक्युपंक्चर रत्न 2023’ या पुरस्काराने सन्मानपत्र आणि गौरव चिन्ह देऊन यांना सन्मानित करण्यात आले. इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून संपूर्ण देशात चांगले अॅक्युपंक्चर थेरपी तज्ञ घडवण्याचं काम चालू आहे. त्याच बरोबर रुग्णांना उत्कृष्ट अॅक्युपंक्चर पद्धतीने विविध आजारांवर उपचार करणाऱ्या तज्ञांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांच्या कामाचा गौरव म्हणून, काही वर्षांपासून या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. यावर्षीच्या पुरस्कारासाठी वैद्य युवराज जाधव यांची निवड करण्यात आली. सध्या वैद्य जाधव हे ‘पंचगव्य चिकित्सा’ पद्धतीचा वापर करून व त्याचबरोबर अॅक्युपंक्चर पद्धतीचा वापर करून, विविध आजारांवर उपचार करून, रुग्ण सेवा करत आहेत. अर्थार्जनाचा विचार न करता, रुग्णसेवेला प्राधान्य देऊन विविध आजाराने त्रस्त रुग्णांना आजारातून मुक्त करण्याचे काम करत आहेत. ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांना याचा लाभ होण्याच्या दृष्टीने त्यांचे काम चालू आहे. समाजसेवेची भावना, आरोग्य विषयी प्रबोधन प्रबोधनात्मक जनजागृती करून, माणसांचे आरोग्य औषधाविना एका उंचीवर नेण्याचं गौरवपूर्ण प्रेरणादायी काम केल्याने, त्यांच्या या कामाची दखल घेऊन, त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य अॅक्युपंक्चर परिषदेचे अध्यक्ष डॉ. बहरामजी व प्रियोग इंटरनॅशनल अल्टरनेटिव्ह थेरपी इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या अध्यक्षा कर्नाटक मॅडम इत्यादी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


