मारोती सुर्यवंशी
शहर प्रतिनिधी, नरसी
नरसी : तमाम महाराष्ट्रातील घराघरांत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार आणि कार्य पोहोचले आणि बघता बघता संपुर्ण देशात शिवसेना नावाच्या धगधगत्या विचाराचा वटवृक्ष झाला .परंतु काही “कपाळ करंट्या” “बाजार बुणग्याची” नजर लागली आणि उभी फूट पडल्याने विचलीत झालेल्या शिवसैनिकांना उत्साह निर्माण करण्यासाठी व एकंदरीत आढावा घेण्यासाठी आणि मार्गदर्शनपर संवाद साधताना
त्यानी जनतेच्या मनात आजही शिवसेना पक्षप्रमूख उद्धवजी ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळातील लोकाभिमुख कार्यपद्धतीची आठवण कायम आहे.हाच जनविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी शिवसैनिकांनी गावागावात जावून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख प्रमोद खेडकर यांनी केले.नायगांव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिका-यांची महत्वपूर्ण आढावा बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी नरसी येथील तालुका शिवसेना संपर्क कार्यालयात पार पडली.शिवसेना पक्षप्रमूख उद्धवजी ठाकरे यांचा आगामी जिल्हा दौरा, संघटनात्मक बांधणी व इतर महत्वपूर्ण विषयांवर यावेळी चर्चा झाली.पक्षाने दिलेली जबाबदारी ही जनसेवेची संधी समजून सर्व पदाधिका-यांनी कठोर परिश्रमाने समाजातील सर्व घटकांशी समन्वय साधत शिवसेनेच्या धगधगत्या मशालीने परिसर समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध राहीले पाहीजे अशीही भुमिका जिल्हाप्रमुख प्रमोद खेडकर यांनी यावेळी मांडली.नायगांव, उमरी व धर्माबाद या तीनही तालुक्यातील संघटनात्मक वाटचालीचा गांवनिहाय आढावा देखील जिल्हाप्रमुख प्रमोद खेडकर यांनी घेतला.येणाऱ्या संकटांना जिद्दीने सामोरे जात लढाऊ वृत्ती जोपासून एकनिष्ठेने पक्षकार्य सुरु ठेवा.उद्याचा येणारा काळ आपलाच आहे असेही शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद खेडकर यावेळी म्हणाले.शिवसेना नायगांव तालुकाप्रमुख रवींद्र भिलवंडे यांनी आपल्या प्रभावी प्रास्ताविक मनोगतात नायगांव तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या आगामी लक्षवेधी सामाजिक उपक्रमांची मुद्देसुद माहीती दिली. याप्रसंगी जिल्हा संघटक विजय मुडंकर, उपजिल्हाप्रमुख गणेश गिरी, नायगाव तालुकाप्रमुख रविंद्र भिलवंडे, उमरी तालुकाप्रमुख बालाजी सावंत, तालुका संघटक राजेश लगंडापुरे, मारोती कागेरू, भागवत शिदे, गौरव कोडगिरे, रवि हाटकर, नायगांव शहरप्रमुख गजानन तमलुरे, बालाजी माली पाटील, शिवाजी शिंदे, रावसाहेब वडजे, रामदास पवार, नागेश पाटील, अनिल बोधने, मारोती भागानगरे, संतोष देशमुख, प्रभाकर मेघळ, बालाजी कुरे, ईरफान बेग, शंकर नरसीकर शेख अजर शेख तनु व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.