नंदकुमार कावळे
तालुका प्रतिनिधी, महागाव
महागाव : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले आंबोडा या गावाची लाईन गेल्या एका महिन्यापासून बंद असल्याकारणाने आंबोडा शहरातील समस्त गावकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसून गेल्या सहा दिवसापासून साखळी उपोषनाला आजचा सहावा दिवस निघाला समस्त आंबोडा गाव एका महिन्यापासून अंधारात राहत असल्याचे उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने यांना कळताच त्यांनी तात्काळ वीज वितरण कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलावून आंबोडा येथील लाईननीचे काम तात्काळ करण्यात यावे. असे आदेश अधिकाऱ्यांना देऊन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते.यावेळी वीज वितरण कंपनीचे अभियंता श्री चव्हाण नवीन डीपी चे काम चालू आहे दिनांक १६/७/२०२३ रोजी दुपारी चार वाजेपर्यंत आंबोडा गावातील लाईव्ह चालू करण्याचे आश्वासन गावकऱ्यांना देण्यात आले. यावेळी दीपक पाटील राऊत विनोद पाटील राऊत रोहिदास पाटे हणवंतराव देशमुख माजी नगरसेवक राजू राठोड. बंडू वाघमारे व गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते.


