बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
इंदापूर : महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला मांगुर मास्याचा टेंम्पो सोलापूर कडे जात असताना इंदापूर पोलिस स्टेशन चे ए पी आय नागनाथ पाटील यांनी राजवडी येथे पकडला आणि पुढील कारवाईसाठी मत्स्य विभाग पुणे यांना बोलावून संयुक्त कारवाई करत नष्ट मासा करण्यात आला.परंतु इंदापूर तालुक्यातील उजनीच्या हद्दीमध्ये भिमा नदीच्या पात्रात हजारो मांगुर माशांचे तलाव बेकायदेशीर खोदकाम करून तयार केलेले आहेत यावर उजनीचे अधिकारी मुग गिळून गप्प बसले आहेत हे अधिकारी व मत्सविभाग का कारवाई करत नाहीत.हा नागरिकांना पडलेला मोठा प्रश्न आहे.याच मांगुर माशांचे तलावात चिकनचे वस्टेज मांस,मेलेली जनावरे,मेलेली कुत्री, सडलेले हाँटेल मधील खाद्यपदार्थ ,खिमा करून मांगुर माशांना खाद्य म्हणून दररोज वापरत आहेत.याच सडलेल्या मांसामुळे तलावातील दुषित झालेले पाणी दर १५ दिवसाला बदलावे लागते ते दुर्गंधीयुक्त दुषित पाणी भिमा नदीच्या पात्रात हजारो लिटर सोडले जात आहे. हेच पाणी हजारो गावांमध्ये पाणी पुरवठा योजने द्वारा लाखो नागरिकांच्या घरात जाते. आणि ग्रामस्थ कँन्सर सारख्या आजाराला बळी पडतात.मग ऐवढा मोढा नागरिकांच्या जिवाशी खेळ कोणाच्या आशिर्वादाने चालू आहे हे देखील न सुटणारे कोडे आहे. संबंधित उजनीचे भिगवणचे अधिकारी यादव यांना संपर्क साधला असता ते म्हणाले की, तक्रार प्राप्त झाल्यावर कारवाई करण्यात येईल.तसेच मत्य विभागाचे विकास अधिकारी पुणे किरण वाघमारे म्हणाले की चिकनचे वस्टेज वापरण्यास बंदी घातली आहे.आणि संबंधित सर्वच विभागांची मिटींग घेऊन पुणे जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात येणार आहे.यावर उजनीचे व मत्सविभागाचे अधिकारी काय कारवाई करणार हे देखील पाहावे लागणार आहे.उजनीच्या, आणि मत्सविभागाच्या डोळ्यांवर नोटांचे बंडल बांधले आहेत का असा प्रश्न देखील नागरिकांना पडला आहे.तसे नाव न घेण्याचा अटीवर काही नागरिकांनी बोलून दाखवले आहे.


