डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी, परभणी
सेलू : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने दि.12 फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इ. 5 वी आणि 8 वी शिष्यवृती परीक्षेचा अंतिम निकाल दि.13 जुलै रोजी जाहीर करण्यात आला असून त्या मध्ये यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या स्कॉलरशिप गुणवत्ता यादी मध्ये इयत्ता पाचवी मधील दोन विद्यार्थी1)) राम तौर 2) स्वरा रोकडे व तसेच 3) नविन प्रवेश झालेली कु .प्रियल नितनवरे हि सुदधा स्कॉलरशीप फोल्डर झाली आहे .इयत्ता आठवीचे दोन विद्यार्थी 1) वेंदात मालपाणी 2) स्वराज अंभोरे स्कॉलरशिप होल्डर झाले आहेत सदरील विद्यार्थीच्या यशाबद्दल यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष मुकेश हरिभाऊकाका बोराडे, माजी नगराध्यक्ष विनोदरावजी बोराडे, तसेच यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संचालक साईराज मुकेशराव बोराडे शाळेचे प्राचार्य व सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे व त्याच्या आई-वडीलांचे अभिनंदन केले आहे. त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


