सुधीर जाधव
जिल्हा प्रतिनिधी, सातारा
सातारा : माजी जि. प. सदस्य राजू भोसले यांच्या नेतृत्वाखाली उरमोडी धरणग्रस्त समितीची बैठक अधिकाऱ्यांबरोबर लावून रेंगाळलेले प्रश्न सोडवले. बैठक प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्यासोबत, तहसीलदार राजेश जाधव, जि. प. सदस्य राजू भोसले, वसंत भंडारे, दीपक देवरे, व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. यामध्ये एकूण 24 मागण्यांवर चर्चा करण्यात आली. रोहोट, दहिवड, वडगाव, आगरवाडी, रेवली, परळी, कातवडी, अष्टे, कासारस्थळ, जामगाव मधील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न उपस्थित करून, त्याचा निपटारा करण्यात आला. चुकलेला नकाशे दुरुस्त करून द्यावे, त्याच बरोबर वेणेखोल येथील शेतकऱ्यांना म्हसवड येथे भूखंड उपलब्ध करावे. वडगाव साठी क्षेत्र संपादन करून उपलब्ध करावे, आणि निगुडमळ खातेदारांना धामणी येथे भूखंड वाटप करावे. अशी मागणी राजू भोसले यांनी केली. माण खटाव तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी ज्यांनी आपली वडीलोपार्जीत मालमत्ता शासन भरोसे सोडून दिली. आहे त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची सर्व जबाबदारी शासनाची असल्यामुळे त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन मार्गी लावण्याचे काम केले जाईल असे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी सांगितले आणि तात्काळ कृष्णा खोरे व पुनर्वसन अधिकारी यांना कार्यवाही करण्यासाठी आदेश देण्यात आला.


