डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने दि. 12 फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इ.5 वी आणि इ.8 वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल दि. 13 जुलै 2023 रोजी जाहीर झाला असून श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या -5- विद्यार्थीनी जिल्हा यादीत शिष्यवृत्तीधारक ठरल्या आहेत. इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीनी.1)कु.चिंचोलकर प्रतिक्षा शरद गुण (220)जिल्ह्यात 54 वा क्रमांक.इयत्ता आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीनी.1)कु.मुनेश्वर स्नेहा प्रदिप गुण 238 जिल्ह्यात 12वा.क्रमांक. 2)कु.राऊत श्रेया गजानन गुण 230 जिल्ह्यात16वा क्रमांक 3) कु.रासवे ज्ञानेश्वरी आसाराम गुण 230जिल्ह्यात 19 वा क्रमांक.4) कु.गलबे अक्षरा पंजाब गुण 208 जिल्हात 38 वा क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के. देशपांडे सर,सचिव डॉ. व्ही के कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती,प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी नूतन कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता खराबे, उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, शिष्यवृत्ती विभागातील सर्व शिक्षक,सर्व कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.