सुधीर जाधव
जिल्हा प्रतिनिधी सातारा
सातारा: भारतीय लष्कर सेवेत काम करणारे आणि सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांच्यासाठी स्वराज्य फिल्मचे निर्माते विजय निकम एक आगळावेगळा उपक्रम करत आहेत. आज आपण ज्या सैनिकांच्या मुळे सुरक्षित शांत झोप घेत आहोत, ते जवान देशाच्या सीमेचा रक्षण करण्यासाठी किती खडतर पहारा देतात व परिश्रम घेतात, तिथं त्यांचा चालणारा जीवनक्रम आणि सेवानिवृत्त झाल्यानंतरचा जीवनक्रम त्याचबरोबर सेवेत रुजू होण्यापूर्वी असणारं त्यांचं जीवन हे टेलिव्हिजन मालिका “शौरम्” च्या माध्यमातून सैनिकांबरोबर, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह जर शहीद असतील तर वीर माता पिता, वीर मुलगा मुलगी, वीर पत्नी यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून, त्यांच्या सोबत स्वतःचे अनुभव व त्यांच्या कुटुंबाचे अनुभव, एकंदर कुटुंब, नोकरी, आणि समाज या बरोबरचा त्यांचा जीवन प्रवास संपूर्ण महाराष्ट्र समोर उलगडणार आहे. यासाठी स्थानिक कलाकारांना संधी देऊन हा उपक्रम पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. असं मत त्यांनी व्यक्त केले. स्वतंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत सातारा जिल्ह्यात सैनिकांची मोठी परंपरा असल्यामुळे या मालिकेचा शुभारंभ सातारा तालुक्यातील काळोशी या गावी ग्रामदैवत वाघजाई देवी समोर श्रीफळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी सरपंच संजय निकम उपसरपंच रंगराव निकम निर्माते दिग्दर्शक विजय निकम छायाचित्रकार विनोद बोडके रवींद्र निकम व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ महिला उपस्थित होते.


