गजानन ढोणे
ग्रामीण प्रतिनिधी बुलढाणा
बुलढाणा : राजुर घाटात अनेक जण फोटो काढण्यासाठी थांबतात.. त्याच राजुर घाटात धक्कादायक प्रकार घडतायेत आधी मोबाईल चोरणारी टोळी या भागात सक्रिय होती.. आता त्याच ठिकाणी अत्याचार करणारे राक्षस सुद्धा दुपारी एकत्रित होतात.. नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झालेल्या या राजूरच्या घाटात काल 35 वर्षीय महिलेवर आठ नराधमांनी सामूहिक बलात्कार केला.दिवसेंदिवस जिल्ह्यात बलात्काराच्या घटना वाढीस लागल्या महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतोय..गेल्या काही दिवसांपासून घटनाही त्या प्रकारच्या घडताहेत.. चिमुकली राधिकेचा थरार घडून काहीच महिने त्यात हा नवीन धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोराखेडी पोलिसांकडून मिळालेल्या फिर्यादीनुसार चाकूचा दाख दाखवून 35 वर्षीय महिलेवर ८ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना काल संध्याकाळी उघडकीस आली.. दरम्यान पीडित महिले सोबत असलेल्या फिर्यादीने याबाबत बोराखेडी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यामध्ये नमूद आहे की, पीडित महिलेसह आणखी दोन जण गुरुवारी दुपारी दोन वाजेदरम्यान राजुर घाटात देवीच्या मंदिराच्या परिसरात सेल्फी काढण्यासाठी थांबले. दरम्यान आठ नराधमांची टोळी त्या ठिकाणी जमली. आणि चाकूचा धाक दाखवून फिर्यादी जवळचे नगद ४५ हजार लुटले त्यानंतर पिढीतेवर अत्याचार केला. आठ जणांपैकी दोघांनी फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून ठेवला होता. नंतर पीडीतेला दरीत नेऊन जबरदस्तीने आठ जणांनी आळीपाळीने अत्याचार केला. आरोपींपैकी एक घटनास्थळाच्या जवळच असलेल्या मोहेगावचा राहुल रमेश राठोड असल्याचे निष्पन्न झाले इतर सात आरोपींचा शोध पोलीस घेतायेतं. त्या पीडित महिलेसोबत असलेल्या नातेवाईकांना मारहाण हि केली.पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास उशीर केला असा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.त्यानंतर आठ आरोपींवर बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या आठ ही अज्ञात आरोपींचा पोलीस तपास करत आहे. दरम्यान रात्री तब्बल तीन तास आमदार संजय गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून पोलीस अधीक्षकांशी संपर्क केला. त्यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणेला गती प्राप्त झाली. अज्ञात आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी असे आमदार संजय गायकवाड म्हणाले. सदर गुन्ह्याचा तपास बोराखेडी चे पीआय माधवराव गरुड, पिएसआय अनिल भुसारी करत आहेत.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)