कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
न. प .द्वारा संचालित पापालाल जैयस्वार मराठी हायस्कूल मध्ये आज दिनांक १०/७/२३ सोमवार ला वर्ग ५ ते १० च्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमा चे अध्यक्षस्थानी न.प.चे कर्तव्यदक्ष उपमुख्याधिकारी सन्माननीय श्री.सुरेश राठोड साहेब आणि प्रमुख अतिथी म्हणून कामासाठी सदैव सहकार्य व तत्पर असणारे श्री.अमोल मदने साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन श्री. चव्हाण सर आणि प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका पान्हेकर मॅडम तर आभार प्रदर्शन स.शि.श्री सुरोशे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सहाय्यक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.