शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी, नांदुरा
नांदुरा तालुक्यातील शेंबा बु व शेंबा खुर्द गावाच्या मधे विश्वगंगा नदीवर दोन महिन्यापूर्वी अंदाजे साडेपाच कोटी रुपये च्या द्वारयुक्त सिमेंट बंधाऱ्याचे भुमिपूजन मलकापूर मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार मा. आमदार राजेश एकडे व तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेवून नारळ फोडीत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली होती. कंत्राटदाराने सुद्धा युद्धपातळीवर आपली यंत्रणा राबवित वेळेच्या आतच द्वारयुक्त सिमेंट बंधारा बांधून पूर्ण केल्याने पावसाळ्याच्या पहिल्याच पाण्यात सदर बंधारा हा तुडूंब भरला असून शेंबा खुर्द च्या पुलापर्यत पानी अडलेले आहे. तसेच एका रात्रीतून या भागातील विहीर, बोअर यांना पाझर फुटुन पानी आल्याने या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दि.०७ जुलै रोजी आमदार राजेश एकडे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांचे समवेत विश्वगंगा नदीवरील द्वारयुक्त सिमेंट बंधाऱ्यावर जाऊन विश्वगंगा नदीतील जलाचे जलपूजन केले व विश्वगंगा मातेला सर्व शेतकऱ्यांना सुखी ठेव अशी प्रार्थना केली .यावेळी गावकऱ्यांच्या वतीने आमदार राजेश एकडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी पंचायत समिती सदस्य संजय सिंग राजपूत, माजी पंचायत समिती सदस्य जयप्रसाद सिंग राजपूत, रामदास पाटील, अतुल सुपे, शिवसेना तालुकाप्रमुख ईश्वर पांडव, शेंबा सरपंच नंदकिशोर खोंदले, सरपंच निखिल पाटील ,नांदुरा बाजार समिती संचालक प्रवीण भिडे, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश सुशीर , जगन्नाथ भोपळे, मंगेश भिडे, सुधाकर बोरकर, सुनील पाटील ,जीवन पाटील, अर्जुन तांगडे ,दीपक दाभाडे, गौतम दाभाडे , सुभाष कवळे वासुदेव जाधव, रामभाऊ चौधरी, अमोल जाधव , प्रल्हाद करंकार , राहुल सुरडकर, राम महाजन, निखिल चौधरी, रामभाऊ काटकर, लक्ष्मण चौधरी हे उपस्थित होते.


