बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
दौंड : उज्वला चंद्रकांत मोरे यांनी ३८ वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना अनेक आदर्श पिढया घडवण्याचे काम केलेले असून त्यांचे कार्य आदर्शवत असल्याचे प्रतिपादन निवृत्त शिक्षणाधिकारी अंकुश जंजिरे यांनी केले.
जि प प्राथ शाळा खानवटे च्या मुख्याध्यापिका सौ. उज्वला चंद्रकांत मोरे यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. अंजली ढवळे या होत्या. यावेळी पुढे बोलताना त्यांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतांमधून मॅडमची विद्यार्थ्यांविषयीची आपुलकी व्यक्त होत असून त्यांचे आडनाव मोरे हे संतपरंपरेतील असल्याने त्यांच्या हातून चुकीचे काम होऊच शकत नाही असे सांगितले. उज्वला चंद्रकांत मोरे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिक्षण क्षेत्रातील सध्याच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आणि शिक्षकांनी अधिक प्रभावीपणे काम केले तरच जिल्हा परिषदेच्या शाळा भविष्यामध्ये खाजगी शाळांच्या स्पर्धेत टिकू शकतील असे सांगितले. यावेळी छत्रपती साखर कारखान्याचे माजी संचालक नानासाहेब दराडे यांनी मनोगत व्यक्त करत उज्वला मोरे यांच्या अंगी असलेल्या विविध गुणांचे कौतुक केले. तसेच त्यांच्या स्वभावाची अनेक वैशिष्ट्ये सांगितली. एकाच गावामध्ये ३८ वर्षांच्या सेवेपैकी २९ वर्षे सेवा पूर्ण करणे ही खरे तर फार मोठी कसोटी असून मोरे मॅडम त्या कसोटीला उतरल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी रेखा कन्हेरकर,संतोष नवले, राजेंद्र झोंड, शहाजी नगरे, दत्तात्रय खुटाळे, हिंगे मॅडम, मनिषा पोटफोडे, प्रा. सुरेंद्र शिरसट, विनायक वाघमारे, अविनाश गायकवाड, प्रवीण कोरे या माजी विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यांच्या समवेत काम केलेले जाधव गुरुजी, सतीश दराडे यांनीही आपल्या भावना याप्रसंगी व्यक्त केल्या. माजी प्राचार्य भांडवलकर सर, माजी उपसरपंच किशोर माहुरकर, पुणे जिल्हा शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील वाघ, केंद्रप्रमुख वैशाली जानराव यांनीही या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सौ उज्वला मोरे यांना सुवर्ण मुद्रा भेट देऊन सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला.राजेगाव केंद्राच्या तसेच खानवटे शाळेच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सन १९९५ च्या बँच चे विद्यार्थी व त्यांच्या वतीने ग्रुपच्या प्रमुख मनिषा पोटफोडे,रेखा ढवळे व दत्तात्रय खुटाळे महाराष्ट्र पोलीस यांनी मोरे मँडम यांना पैठणी,स्मृती चिन्ह, शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी मा.सरपंच मच्छिंद्र पोटफोडे, मा. सरपंच अर्जुन शिरसट, रंगनाथ ढवळे, शरद ढवळे, बाळासाहेब कन्हेरकर, उपसरपंच अर्जुन गायकवाड,केंद्रप्रमुख वैशाली जानराव, आप्पासाहेब मेंगावडे,दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका वर्षाताई मोरे,तक्रारवाडीचे मुख्याध्यापक राजेश नाचन, केंद्र समन्वयक अमजद पठाण, माजी सरपंच जयाताई खुटाळे, हरिभाऊ डाळिंबे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक दयाराम शिंदे , भरत मोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वर्षा ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सत्काराला उत्तर देताना सौ. उज्वला मोरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. सर्वांनी आजपर्यंत उत्कृष्ट सहकार्य केल्यामुळेच आजचा हा दिवस पाहता आल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव बंडगर, सूत्रसंचालन मुख्याध्यापक राजेंद्र मेंगडे यांनी केले. तर आबासाहेब बोडरे ,अर्चना भिसे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.तर आभार चंद्रकांत मोरे यांनी मानले.