सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : मॉडर्न पब्लिक स्कूल,उमरखेड येथे शाळा स्थापना दिवस साजरा करण्यात आला शाळेस यावर्षी स्थापन होऊन नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. नऊ वर्षांपूर्वी मा.आमदार तसेच यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.अनंतरावजी देवसरकर यांच्या मार्गदर्शनात तसेच संस्थेचे अध्यक्ष तथा माजी बांधकाम सभापती जि.प.यवतमाळ श्री राम देवसरकर यांनी लावलेल्या छोट्या अंकुराचे रूपांतर आता मोठ्या वटवृक्षांमध्ये होताना दिसत आहे.शंभर विद्यार्थी संख्येवर सुरू झालेली शाळा आज बाराशे पर्यंत पोहचली आहे. नवव्या वर्धापन दिनानिमित्त शाळेमध्ये आज प्रिफेक्ट निवडण्यात आले त्यामध्ये आठ सीनियर प्रीफेक्ट व आठ जूनियर प्रीफेक्ट निवडण्यात आले तसेच शाळेतील बाल विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मॉडर्न प्ले पार्कचे उद्घाटन सुद्धा करण्यात आले .आजच्या वर्धापन दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती उमरखेडचे गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाढ साहेब उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले त्यासोबतच मॉडर्न पब्लिक स्कूलच्या अध्यक्षा सौ रेणूश्री राम देवसरकर सुद्धा उपस्थित होत्या वर्धापन दिनानिमित्त महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद देशमुख सर यांचीही उपस्थिती होती मॉडर्न पब्लिक स्कूलचे संचालक श्री एडवर्ड राज , सहाय्यक संचालिका सौ मंजुषा राज व व्यवस्थापक सुधीर तवर यांनी वर्धापन दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.


