करामत शाह
ग्रामीण प्रतिनिधी आगर
अकोला : शासन नियमानुसार अपात्र असतांना शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या स्वस्त धान्याचा लाभ घेतल्याप्रकरणी जिल्ह्यात आतापर्यंत 65 जनाविरुद्ध 420 कलमन्वये गुन्हे दाखल करण्यातत आले आहेत.तर 1 हजार 981 जणांनी स्वतः लाभ नकारात असल्याचे अर्ज सादर केले आहेत. दरम्यान दक्षता समितीच्या तपासणीत जिल्ह्यात 11 हजार 24 लाभार्थी अपात्र असल्याचे समोर आले असून, या लाभार्थ्यांवर देखील कारवाई होणार असल्याची माहिती पुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकेवर मिळणारा अन्नधान्याचा लाभा हा पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून शासनाने ”गिव्ह इट ॲप” ही योजना राबवून काही नियम व अटी घालून अपात्र लाभार्थ्यांनी स्वतःहून लाभा बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. त्याची मुदत 15 फेब्रुवारी पर्यंत होती. त्यानंतर दोनदा मुदतवाढ देखील देण्यात आली.काही लाभार्थी स्वतःहून बाहेर पडलेत त्यानंतर गाव पातळीवर दक्षता समितीच्या माध्यमातून सर्वेक्षण करून अपात्र असलेल्या लाभार्थ्यांचा शोध घेण्यात आला.दरम्यान शासकीय सेवेत असलेल्या 65 लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात आली.दरम्यान उर्वरित अपात्र लाभार्थ्यांवर देखील कारवाईचे संकेत पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत.त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांचे धाबे दणाणले आहेत.