फैयाज इनामदार
तालुका प्रतिनिधि जुन्नर
ओतूर : वन अधिकारी असल्याची बतावणी करून कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर जड वहातुक करणाऱ्या वहानांना अडवून पैशांची मागणी करणाऱ्या महाठगास खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असल्याची माहिती ओतूर वन विभाग कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. या महाठकाचे नाव राजेंद्र हरिश्चंद्र गटकळ रा.राजुरी, ता.जुन्नर, पुणे असून तो तोतया वन अधिकारी असल्याचे सांगून पैसे उकळत असल्याचे लक्षात येताच त्याला सापळा लावून रंगेहात पकडून ताब्यात घेऊन ओतूर पोलीस स्टेशन व आळेफाटा पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता १८६० कलम ३८४ अंतर्गत त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यास जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली आहे.