सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : शहरी भागातील सन 2017 -18 मध्ये 257 लाभार्थी व सन 2018-19 मध्ये 245 लाभार्थ्यांची पंतप्रधान आवास योजना अंतर्गत निवड झाली त्यानुसार प्रशासनाकडून प्रत्येक लाभार्थ्याला 2 लाख 70 हजार रुपये देणे बंधनकारक होते .परंतु लाभार्थ्यांचे पूर्ण बांधकाम होऊन सुद्धा प्रशासनाकडून लाभार्थ्यांना अद्यापही पूर्ण रक्कम प्राप्त झाली नसल्यामुळे लाभार्थ्यांना थकीत रक्कम तात्काळ उपलब्ध करून द्या अन्यथा 12 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा मनसेने दि .5 जून रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे दिला. पंतप्रधान आवास योजना अंतर्गत मागील 2018 पासून आज पर्यंत उर्वरित रक्कमेसाठी लाभार्थ्यांचे संघर्ष सुरू आहे .2019 मध्ये लाभार्थ्यांनी आमरण उपोषणही केले छत्रपती शिवाजी महाराज संकुल येथे शोले स्टाईलने आंदोलन सुद्धा करण्यात आले. वारंवार प्रशासनाला निवेदन ही दिले तरीही प्रशासनाला अद्यापही जाग आली नसल्याने प्रशासनाकडून घरकुल लाभार्थ्यांची थकीत रक्कम देण्यात आलेले नाही .उर्वरित रक्कम घरकुल लाभार्थ्यांना देऊन न्याय देण्याचे काम प्रशासनाने करावे अशा मागणीचे निवेदन येथील मनसे च्या वतीने देण्यात आले. सन 2018 – 19 पासून घरकुल लाभार्थी बांधकामासाठी घरातील सोने -नाणे ,दागिने लोकांकडून हात उसने व उच्च व्याजदरावर पैसे घेऊन समस्यांना सामोरे जाऊन आपल्या घराचे बांधकाम पूर्ण केले . बांधकामामुळे येथील सर्वाधिक लाभार्थी आर्थिक व मानसिक दृष्ट्या अडचणीत सापडला आहे त्यामुळे प्रशासनाने त्वरित घरकुल लाभार्थ्यांची थकीत रक्कम देण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दि 12 ऑगस्ट रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष डेविड शहाणे ,शहर अध्यक्ष संजय बिजोरे पाटील, संदीप कोकाटे, मनोज कदम ,अमोल लामटिळे, प्रवीण भिमटे ,प्रवीण कनवाळे ,विशाल कदम, आकाश ओझलवार ,अमोल मोरे , अनुराग जोगदंड सह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


