संदीप टूले
तालुका प्रतिनिधी दौंड
दौंड : तालुक्यातील केडगाव येथील एक हात मदतीचा फाऊंडेशन एक सामजिक बांधिलकी जपणारा उप्रकम गेली ८ वर्ष राबवित असून यामध्ये ज्या विद्यार्थांना आई वडील नाहीत अनाथ आहे अश्या मुलांना या फाऊंडेशनच्या मार्फत दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात येत असून या गृप च्या मार्फत यावर्षी केडगाव परिसरातील जवळपास ३२अनाथ मुलांना मदत देण्यात आली आहे . तसेच मागील काही दिवसांपूर्वी या ग्रुपने ऊसतोड महिलांसाठी २०० साड्यांचे वाटप केले होते. हा ग्रुप कसा काम करतो. केडगाव येथील धनराज मासाळ यांनी सोशल मीडियावर फक्त सामाजिक कामासाठी केडगाव हेल्प नावाने एक ग्रुप बनवला असून या ग्रुप मध्ये जवळपास ६८० सदस्य असून अश्या सामाजिक कामासाठी या गृपवर मदतीसाठी आव्हान केले जाते यातून मिळणारी मदत ही पैशाच्या स्वरूपात, शैक्षणिक साहित्याच्या स्वरूपात स्वीकारली जाते व त्याचे योग्य नियोजन करून गरजू विद्यार्थ्यानं पर्यंत पोहचवली जाते. त्यांनी केलेल्या सामाजिक कामाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.