रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : दि.30 जून 2023 ला तालुका कृषी अधिकारी श्री नरेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे मोराडी येथील प्रगतशील शेतकरी श्री जयेश बोहरा यांच्या शेतामध्ये स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होता. या शेतीशाळेमध्ये बीज प्रक्रियाचे महत्व व गटातील 30 व्यक्तीचे प्रात्यक्षिक बाबत चर्चा करण्यात आली. कृषी संजीवनी सप्ताह निमित्त पौष्टिक तृणधन्याचे आहारातील महत्त्व, कार्यक्षेत्रात ठिबक सिंचनाचे क्षेत्र वाढवून कपशी पिकाखालील जास्तीत जास्त क्षेत्र ठिबक सिंचन खाली कसे येईल या विषई माहीती कृषी पर्यवेक्षक श्री जी डी नागे यांनी संबंधित शेतकऱ्यांना दिली. तसेच पेरणी करताना 100 मी.मि. पाऊस झाल्याशिवाय कोणीही बियाण्याची पेरणी करूनये इत्यादी बाबीवर माहीती देण्यात आली .शेतीशाळे मध्ये श्री श्रीकांत कराडे कापूस मूल्य साखळी विकास तज्ञ यांनी स्मार्ट कॉटन प्रकल्पा बद्दल माहीती दिली. या शेती शाळेमध्ये कृषी सहायक एस. पी. राजनकर, एम. ए. इंगळे, एम. व्ही. सारभुकन, पि डब्लू.पेठे ,व्ही.बी.बिहाडे,बि.टि.एम. दिपक मोगरे व गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.