कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा येथे सर्व गावकऱ्यांनी जगन्नाथ रथाचे दर्शन घेऊन पुष्प उधळून स्वागत केले.यामधे गजानन महाराज मंदिरापासून जगन्नाथ रथ पूर्ण गावातून प्रदक्षणा घालून यात्रा पूर्ण झाली.यामध्ये पुरुष,महिला,ज्येष्ठ नागरिक,दुर्गा शक्ती शाखा सोनाळा यांनी सहभाग नोंदविला.सर्वांना महाप्रसाद म्हणून जगन्नाथ खिचडीचा महाप्रसाद देण्यात आला.यामध्ये गावातील सरपंच हर्षल खंडेलवाल डॉ.निलेश घनोकार,अनंतशेष दास,अमरावती,प्रदीप वडोदे,प्रकाश ठाकरे, भिकाजी ठाकरे,श्रीकृष्ण घनोकार,समस्त हरे कृष्ण वृंद परिवार तर्फे गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले.


