अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालय शिरला अंधारे ता पातूर जी अकोला,यांच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घाटन अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रोहित तांबे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला विद्यार्थी कल्याण विभागा तर अध्यक्षस्थानी कृष्णा भाऊ अंधारे संस्थापक अध्यक्ष श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिरला अंधारे हे होते.या प्रसंगी श्री दीपक गावंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम खर्डे, निवड समिती सदस्य प्रा. शैलेश दवणे, प्रा.निलेश खडसे उपस्थित होते.उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरुवातिला पाहुण्यांचा हस्ते कृषिरत्न शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. यानंतर उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. बॉक्सिंग 2023 या स्पर्धेत या स्पर्धेमध्ये एकूण 7 महाविद्यालयतील 18 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा एकूण 13 वजन वर्गवारी मध्ये घेण्यात आली.या स्पर्धेत श्रीमती सुमित्राबाई अंधारी कृषी महाविद्यालय शिरला अंधारे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव जामोद, सौ. वसुधाताई देशमुख अन्न तंत्रनात महाविद्यालय, पाला अमरावती, कृषी महाविद्यालय, रिसोड,कृषी महाविद्यालय, नागपूर, कृषी महाविद्यालय, हिवरा आश्रम व कृषी महाविद्यालय, गडचिरोली या महाविद्यालयांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाचे संचालन प्रा. शैलेश दवणे यांनी केले. ही स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित करण्याकरिता प्रा. सागर भगत प्रा. सौरभ वर्मा प्रा शिवकुमार राठोड प्रा. हर्षल पोरे, प्रा भाग्यश्री राऊत वl यांनी परिश्रम घेतले.