बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
पुणे : पुण्याची शान आणि आख्या महाराष्ट्राला आपल्या लावणीने वेड लावल आणी त्यांच्या आदाकारीवर आवघा महाराष्ट्र फिदा झाला त्या. लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर यांनी दिनांक २१/०६/२३ रोजी .तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये हैद्राबाद येथे भारत राष्ट्र समिती या तेलंगणा मधील पक्षामध्ये.प्रवेश केला आहे.आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोर का झटका.दिला आहे.सुरेखाताई पुणेकर ह्या अजित पवार यांच्या फार निकटवर्तीय होत्या. तसेच भारत राष्ट्रसंत समिती पक्षाने महाराष्ट्रामध्ये जोरदार एन्ट्री करत आपल्या पक्षात इन्कमिंग जोरात चालू केले आहे. आजी-माजी आमदार यांच्यावरती त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.भारत राष्ट्र समीती पक्ष हा सुरेखाताई पुणेकर यांच्यावर पुणे जिल्ह्यात मोठी जबाबदारी देणार असल्याचे बोलले जात आहे तसेच सुरेखाताई पुणेकर म्हणाल्या की तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव जे जबाबदारी .देतील ती समर्थपणे स्वीकारून त्या संधीच सोन करू.


