सतिश गवई
तालुका प्रतिनिधी उरण
उरण : सदर दाखले ऑनलाईन मिळत असल्याने दाखले मिळविण्यासाठी शासकीय सेतू केंद्रात अनेक अर्ज दाखल केले आहेत. परंतु गेली ३ ते ४ दिवसांपासून उरणमधील नव्हेतर राज्यातील सर्वच शासकीय सेतू केंद्रावरील इंटरनेट सेवा खंडीत झाली आहे. त्यामुळे विध्यार्थ्यांना प्रवेशासाठी शासकीय दाखले मिळण्यास विलंब होत असल्याचे दिसून येते. उरण मधील सेतू केंद्रात दररोज १०० च्या वरती अर्ज येत असल्याची माहिती सेतू केंद्रात चालक विलास पाटील यांनी दिली. यामुळे पुढील प्रवेशासाठी मुदतीत अर्ज दाखल केला नाहीतर आपले वर्षे वाया जाते की काय अशी भीती विध्यार्थी व पालक वर्गांना वाटत आहे. यासंदर्भात उरण तहसील कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनीही शासकीय सेतू केंद्राची सेवा सर्वच ठिकाणी बंद असल्याची माहिती दिली. शासकीय सेतू केंद्र इंटरनेट सेवेअभावी बंद पडले असल्याने विध्यार्थ्यांना दाखले मिळण्यास विलंब होत आहे. याचा सारासार विचार करून विध्यार्थीचे शैक्षणिक नुकसान होऊन वर्षे जाऊ नये यासाठी प्रवेशासाठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात यावी. अशी मागणी उरण तालुका. पत्रकार सतिश गवई यांनी शासकीय यंत्रणेकडे केली आहे.