मधुकर केदार
शहर प्रतिनिधी शेवगाव
शेवगाव :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शेवगाव तालुक्यातील श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल लागला आहे.श्रीराम विद्यालयाची विदयार्थीनी कु.सृष्ठी भाऊसाहेब देशमुख ही विद्यालयात मराठी विषयात प्रथम क्रमांकने उत्तीर्ण झाल्याबद्दल गरुडवाडी ग्रामस्थांच्या वतीने तिचा सन्मान करताना दैनिक आधारनामा शहर प्रतिनिधी शेवगाव तालुका श्री. संजय केदार तसेच मा. चेअरमन भिवसेन केदार, मा. सरपंच पांडुरंग गरड, जयकुमार देशमुख,इत्यादी उपस्तित होते या यशाबद्दल तिचे संस्थेचे अध्यक्ष अँड.डॉ.विद्याधर काकडे साहेब,जिल्हा परिषद सदस्या सौ.हर्षदाताई काकडे, संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंह भैय्या काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.लक्ष्मणराव बिटाळ, विद्यालयाचे प्राचार्य श्री.संजय चेमटे,पर्यवेक्षक. श्री.सुनील जायभाये, जेष्ठ शिक्षक श्री.सुधाकर आल्हाट, तसेच पालकांनी तिचे अभिनंदन केले. आज तिचा सत्कार सोहळा गावामध्ये संपन्न झाला.व तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


