रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
हीवरखेड येथील प्रतिष्ठीत कृषी व्यवसायी सुनील राठी यांचे सुपुत्र ओम राठी याचे आय आय टी मध्ये निवड झाली आहे.
अतिशय महत्त्वपूर्ण व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आय आय टी मध्ये निवड होने प्रत्येकाचे स्वप्न असते मात्र लाखो विद्यार्थ्यांत मोजकेच विद्यार्थी त्यात यश मिळवू शकतात.हिवरखेड येथील राठी परिवार मधील ,ह्या दुसरा विद्यार्थी ची आयआयटी मध्ये निवड झाल्यामुळे संपूर्ण हिवरखेड व परिसरातून ओम राठी वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राठी परिवारातीलच भरत विनयसेठ राठी यांनी अकोट मतदार संघातून प्रथमताच
आयआयटीमध्ये घवघवीत यश संपादन करून आपले व गावचे नाव लौकिक केले होते ही येथे उल्लेखनीय बाब.


