कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा येथे आंतरराष्ट्रिय योग दिवस निमित्त दि.२१ जुन रोजी विविध कार्यक्रम राबविले जातील. त्यामध्ये जि.प.शाळा,शासकीयकार्यालय,
पोलीस स्टेशन मध्ये सहजयोग ध्यान बद्दल माहिती देण्यात येईल. यामध्ये ध्यानापासून होणारे फायदे,ध्यानाचे महत्व,दैनंदिन जीवनात ध्यान केल्याने आपला कसा लाभ होतो याबाबत सुध्दा माहिती देण्यात येईल.कार्यक्रमाचे नियोजन श्री वासुदेव मेहनकार,प्रवीण मेहनकार,प्रमोद पाटील करतील.तसेच सहजयोग ध्यान बद्दल सौ.संगीता मेहनकार ह्या मार्गदर्शन करतील.