अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे सलग्न अकोला जिल्हा कलाध्यापक संघ अकोल्याची सर्वसाधारण सभा स्थानिक बी आर हायस्कूल अकोला येथे घेण्यात आली.जिल्हा संघाचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन कार्यकारिणी गठीत करण्याकरीता जिल्ह्यातील कला शिक्षकांची सर्वसाधारण सभा बोलावण्यात येऊन यामध्ये निवडणूक बिनविरोध करून पुढील पाच वर्षाकरिता जिल्हाध्यक्षपदी संदीप देवानंद शेवलकार तर सचिवपदी चंद्रकांत अनंत वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तसेच उपाध्यक्ष- अमर देशमुख,दिनेश पाटील, कोषाध्यक्ष-मुकेश गव्हाणकर, सहसचिव-विठ्ठल ईडोळे, सदस्यपदी-विनोद मोरे,आनंदा फुलारी,गणेश पोटदुखे,अमोल वानखडे,राहुल राठोड,रविन्द्र काळपांडे,महिला प्रतिनिधी-अमृता पारसकर, मेघमाला काठोके, अर्चना बोरोकार, साधना बोबडे, शारदा जाधव यांची निवड करण्यात आली.वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी श्री संजय आगाशे, प्रमुख उपस्थित पाहुणे नरेंद्र मायी व संघाचे राज्य प्रतिनिधी म्हणून अमरावती विभागाचे सहकार्यवाहक सुभाष धार्मिक मंचावर उपस्थित होते.निवडणूक निर्णय अधिकारी न्यू इंग्लिश स्कूलचे ज्येष्ठ शिक्षक श्रीधर मोकाशी हे होते.सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवीन बिनविरोध झालेल्या कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले. या वार्षिक सभेला अमोल वानखडे, बिपिन पवार,दीपक भुसारी,अरविंद मानकर,मनोज वाडेकर,वैभव पोटे,रविंद्र वसे,सौरभ श्रीवास्तव,शारदा जाधव तसेच जिल्ह्यातील बहुसंख्य कलाशिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन संजय गोपनारायण तर आभार प्रदर्शन अविनाश नळकांडे यांनी केले.