सय्यद मुहाफिज
शहर प्रतिनिधी अहमदनगर
अहमदनगर : तोफखाना पोलीस स्टेशन हद्दित घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील 2018 पासून फरार असलेल्या आरोपीला तोफखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.शहरातील सिद्धार्थनगर येथील खुनाच्या गुन्ह्यातील 2018 पासून फरार असलेल्या आरोपीस अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे.तोफखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 280/2014 भारतीय दंड विधान कलमा प्रमाणे दिनांक 03/06/2018 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता,गुन्ह्यातील आरोपी फरार दाखवून गुन्ह्याचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.त्या दिवसापासून सदर गुन्ह्यातील आरोपी रवींद्र कचरू पंढरी रा. नेऊरगाव तालुका गंगापूर हा फरार होता.तोफखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पोलीस पथकाने त्याचा शोध घेतला असता तो पैठण जिल्हा औरंगाबाद येथे राहत असलेल्या माहितीवरून त्यास पैठण पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्यात अटक केली आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक, राकेश ओला साहेब, अनिल कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व त्यांचे पोलीस पथकाने केली आहे.