कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा गावाची स्वच्छता राखण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष काळजी घेतली आहे. ‘एक कदम स्वच्छता की और’ या ब्रीदवाक्याखाली ग्रामपंचायत कार्यरत आहे. पंधराव्या वित्त आयोगातुन ग्रामपंचायतींनी पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक घंटागाडी आणली आहे.संग्रामपूर
तालुक्यातील सोनाळा ग्रामपंचायतीने गावात मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेवर भर दिला आहे. ग्रामपंचायतींना कचरा संकलनात समस्या येत असल्याने, कचरा संकलन आणि विल्हेवाट लावण्यासाठी 15 व्या वित्त आयोगाने निधी दिला. गावकऱ्यांच्या सेवेसाठी हा कचऱ्याची घंटागाडी गावात सुरू करण्यात आली आहे. सरपंच हर्षल खंडेलवाल, उपसरपंच रहिसाबी शेख रशीद, गटविकास अधिकारी एस.एस.पाटील, सुधीर लवाडे, ललित सावळे, शेख अफरोज, अनंता पिंजरकर, शिवा काटकर, शेख रशीद यांच्यासह ग्रामविकास अधिकारी संजय पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी घंटागाडी चे पूजन केले.