सय्यद मुहाफिज
शहर प्रतिनिधी अहमदनगर
अहमदनगर : सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रोजी शहरातील मंगल गेट परिसरात तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली असून त्यात करण साळुंखे नामक तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.त्याच्या मानेला तसेच बोटाच्या अंगठ्यावर वार झाले असून त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये गफार शेख, शारुख रौफ कुरेशी,सलमान मेहबूख खान यांनी हल्ला केल्याचे करण साळुंखे यांनी सांगितले आहे. या भांडणा मागे नेमके कारण काय आहे. हे अद्याप समजले नसून, विनाकारण भांडणांना जातीय रंग देण्यात येऊ नये,अशी चर्चा लोकांमध्ये होत आहे. या भांडणाची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात बजरंग दलाचे कुणाल भंडारी,शिवसेनेचे दिलीप सातपुते,सचिन जाधव आदींसह मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.