सय्यद मुहाफिज
शहर प्रतिनिधी अहमदनगर.
अहमदनगर : अपहरण करून खंडणीची मागणी करणाऱ्या दोन सराई आरोपींना अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.याबाबत उमा फुलपगार यांनी फिर्याद दिली की, त्यांचे दिर मधुकर फुलपगार यांना संबंधित आरोपींनी 50 लाख रुपये द्या नाहीतर आम्ही जमिनीची खरेदी देणार नाही असं म्हणून बळजबरीने गाडीत बसवून अपहरण केलं होते. त्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता, या गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,अपहरण झालेल्या व्यक्तीला आरोपी हे स्विफ्ट गाडीमध्ये घेऊन दूध डेरी चौकातून शेंडी बायपास रोडने पिंपळगाव माळवी बाजूला घेऊन जात आहे,अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक सानप यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करून,आरोपीवर कारवाई करून पकडण्यास सांगितले.पोलीस पथकाने मोठ्या शिताफिने आरोपींचा पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांतील एकाने सखाराम बर्डे आणि दुसऱ्याने पंकज पाटील उर्फ बेडगे असं सांगितले तर त्यांचा तिसरा साथीदार सुनील ढोकणे हा पळून गेला आहे.या प्रकरणी दोन आरोपींना मोठ्या क्षेत्रात पकडून अपहरण झालेली व्यक्ती मधुकर फुलपगार यांची सुटका करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला , अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व विभागीय पोलिस अधिकारी नगर ग्रामीण विभागाचे संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप,प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि त्यांच्या पथकाने केली आहे.