मधुकर बर्फे
पैठण तालुका प्रतिनिधी
पैठण : पैठण तहसील कार्यालयासमोर १३ जून मंगळवार रोजी विविध मागण्यासाठी पैठण तालुक्यातील आंबेडकरवादी अत्याचार विरोधी संघर्ष समिती च्या वतीने नायब तहसीलदार श्री गिरजा शंकर आवळे यांना निवेदन देण्यात आले. दिनांक १ जुनं २०२३ रोजी नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथे अक्षय भालेराव या तरूणांचा जातियवादी नराधमांनी गावात भीम जयंती साजरी केली म्हणून खून करण्यात आला तर लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील मातंग समाजातील गिरीधर तपघाले याचीं सावकाराने डोळ्यात मिरची पावडर टाकून निर्घृणपणे हत्या केला तसेच मुंबई येथे शिक्षणासाठी गेलेल्या मुलीची हत्या करण्यात आली ,औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शेलगाव येथील मुस्लीम महिलेला विवस्त्र करून मारहाण झालेली घटना घडली, या सर्व घटना निंदनीय आहेत.राज्यात धार्मिक तेड निर्माण करून सामाजिक सलोख्यात मोठ्या प्रमाणात वादविवाद निर्माण केले जात आहेत त्या मुळे राज्यातील बहुसंख्य एस. सी. एस.टी. व अल्पसंख्याक नागरिक असुरक्षित आहेत. स्थानिक गावगुंडाना राजाश्रय मिळतं आहे स्थानिक पोलीस प्रशासन वेळीच दखल घेत नाहीत , गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करतात तेव्हा या सर्व बाबींची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसेच वरील पिडीतांना न्याय मिळाला पाहिजे. अशा प्रकारे मागण्या निवेदनात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावातील अक्षय भालेराव यांच्या खुन्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अक्षय भालेराव यांच्या कुटुंबातील सदस्यास शासकीय नोकरी मिळालीच पाहिजे. व त्याच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करण्यात आलेच पाहिजे बोंढार हवेली या गावचे सर्व शासकीय अनुदान बंद झालेच . अक्षय भालेराव याची हत्या झाली त्यावेळी कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक यांना बडतर्फ करून त्यास सह आरोपी केलेच पाहिजे.. असे निवेदन पैठण तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार श्री गिरीजा शंकर आवळे यांना देण्यात आले . या प्रसंगी दशरथभाई आडसुळ,बाबासाहेब गायकवाड,जगन साळवे,भिमराव गायकवाड, संजय खडसन,नंदकिशोर मगरे,गौतम सोनवने,राहुल गिरे,अकिल शेख,रामदास गुढे,बबन पटेकर,देवा आहीरे,संदिपान गलधर,संजय मिरदे,सतिष मगरे,सह ईतर कार्यकर्त्यांची मोठ्या संख्खेने ऊपस्थिती होती.