बंकटी हजारे
तालुका प्रतिनिधी माजलगाव
माजलगाव : बालकल्याण समिती परभणी आणि पंचायत समिती निमगांव यांच्या व्हाटस ॲपद्वारे बीड टीम मेंबर चाईल्ड हेल्पलाईनला माहिती मिळाली. यावरून माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील आठ जणांविरोधात ग्रामसेवक यांच्या फिर्यादीवरुन बालविवाह केल्या प्रकरणी माजलगाव पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, दि.७ मे २०२३ रोजी गंगामसला येथील मोरेश्वर मंदीरात दुपारी दीड वाजता परभणी जिल्हयातील निमगांव येथील अल्पवयीन मुलीचा व गंगामसला येथील गणेश खंडेराया पारडे (वय २४ वर्षे) यांचा विवाह झाला. त्या अनुशंगाने परभणी येथील बालकल्याण समिती आणि पंचायत समिती निमगांव यांनी चाईल्ड हेल्पलाईनच्या टीममेंबरला १०९८ या क्रमांकावर माहिती कळवुन सदरील माहिती ही माजलगांव पंचायतला कळविण्यात आली. त्यानंतर या माहितीवरुन बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार नवरा मुलगा गणेश खंडेराया पारडे, खंडेराया ज्ञानोबा पारडे (मुलाचा वडील), रुक्मीनी खंडेराया पारडे (मुलीची आई) सर्व रा. गंगामसला, कडाजी नारायण चैरे (मुलाचा मामा), शिवकन्या कडाजी चैरे (मुलाची मामी) रा. कासारी बोडखा, सिध्देश्वर उर्फ बाळु हरिभाउ काळे (मुलीचे वडील), निर्मला सिध्देश्वर काळे (मुलीची आई) रा. निमगांव ता. सोनपेठ व रामदेव जोशी (भटजी) रा. माजलगाव अशा आठ लोकांसह सोहळयास उपस्थित इतर लोकांवर माजलगाव पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.


