अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : ३० वर्षानंतर बंदीभाग विकास समितीच्या माध्यमातून पैनगंगा अभयारण्यातील गावामध्ये गरजू मजूरांना तेंदुपत्ता संकलनाचा हक्क प्राप्त झाला . आज मागील २० दिवसापासून तेंदुपत्ता संकलनानंतर पहिली तेंदुपत्ताची ट्रीप संबधीत कंपनीला १३ लाख ५९ हजार पुड्याची गेली . याला यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ केल्याने अतिमागास विकासाचे एक पाऊल पुढे गेल्याचे दिसून आले आहे .मागील अनेक वर्षापासून पैनगंगा अभयारण्यातील बंदीभागातील अनेक गावात तेंदुपत्ता संकलनाचे काम सुरु करण्यात यावे या मागणीसाठी बंदीभाग विकास समितीचे अध्यक्ष व सहकर्यांनी चळवळ उभी करीत शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा केला . येथील उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी या प्रकरणी जातीने लक्ष केन्द्रीत करीत दरवर्षी या भागातून परप्रातांत हजारों मजूर (नागरिक ) रोजगारासाठी आपले गाव सोडून जात असल्याने त्यांनीही गरिब मजूराप्रती दिलासा देत या कामासाठी प्रयत्न केले . आजरोजी मागील महिनाभरापासून अनेक गावात हजारों मजूरांच्या हाताला या तेंदुपत्ता संकलनाच्या माध्यमातून काम मिळाले व दरवर्षी गाव सोडून विस्थापीत होत असलेल्यांना गावातच काम मिळाले आहे .१३ लाख ५९ हजार पुडे तयार झाले असून ते ठेकेदारामार्फत आज बिडी कंपनीला पाठविण्यात आले आहे . अवद्या महिनाभरातच अभयारण्यातील बंदीभागातील मजूरांनी आपला रोजगारही उपलब्ध केला (नगदि स्वरूपात ) आणि त्यांचे स्थलांतरही थांबल्याने तेंदुपत्ता संकलन प्रक्रिया ही उमरखेडसाठी लाभदायी ठरली आहे . या कार्यक्रमात अमोल येडगे यांनी जेवली येथे येऊन तेदुपत्ता फळी पाहून सविस्तर कामाची पाहणी केली आणि भरलेल्या तेंदू पत्ता ट्रक ची पूजा करून ट्रकला हिरवी झेंडी दाखविली .यावेळेस उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड , सहायक वनसंरक्षक अधिकारी खेळभांडे , ना .तहसीलदार पवार ,वनपरिक्षेत्राधिकारी , वनपाल गोटे , वनपाल शिंदे आणि इतर कर्मचारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक जेवली येथील सरपंच भेरलाल साबळे ,भीमराव पाटील, डॉ भगवानराव देवसरकर, सुभाषराव पाटील, उदय नाईक ,आनंदराव महाडिक ,आर डी पटेल ,तेंदू पत्ता मॅनेजर गायकवाड सह शेख सादिक , जेवली येथील समितीचे अध्यक्ष पुंजाराम तळेवाड इतर गावातील समितीचे सर्व अध्यक्ष, सचिव संतोष गवळे ,सहसचिव भीमराव पाटील ,कोषाध्यक्ष मारुती पिलंवट, सदस्य भगवान सिंगसाबळे इतर सर्व मान्यवर हनुमान पिलवंड आणि इतर मान्यवर सर्व उपस्थित होते. यावेळी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आश्वासन दिले की बाकीचे ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर सोडू असे आश्वासन दिले व सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमाला गावातील इतर मंडळी व तेंडू पत्ता जमा करणार उपस्थित होती.