उत्तर प्रदेशातील बांदा येथे लग्नसमारंभाची तयारी सुरू असतानाच नववधू प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात जेव्हा वधूच्या नातलगांना समजली तेव्हा त्यांना धक्का बसला. यानंतर, संबंधित नववधूच्या वडिलांनी त्याच मांडवात आपल्या लहान मुलीचे लग्न संबंधित वरासोबत लावून दिले. संबंधित मुलीच्या वडिलांनी तिच्या प्रियकरा विरोधात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण तिंदवारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या मुलीचे लग्न 8 जून रोजी होणार होते. कन्नौज जिल्ह्यातून वरात येणार होती. त्याचवेळी गावातील एका तरुणाने नववधूला फूस लावून पळवून नेले. पीडितेच्या वडिलांनी आरोपी तरुणाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. या लग्नासाठी वरात जेव्हा दारात आली, तेव्हा नववधू तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे समजले. यानंतर वधूच्या वडिलांनी याच मांडवात आपल्या लगान मुलीचे लग्न संबंधित मिलासोबत करण्याचा निर्णय घेतला. वधूच्या वडिलांनी वरासोबत बोलून आपल्या छोट्या मुलीचे लग्न त्याच्यासोबत लावून दिले. यानंतर वरातीचे स्वागत करून त्यांनी तिची पाठवणी केली. या संदर्भात बोलताना पोलीस ठाण्याचे प्रभारी अनिल कुमार यांनी सांगितले, गावातील एका तरुणाने फूस लावून एका मुलीला पळवून नेल्याची तक्रार आली आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. त्याचा शोध घेतला जात आहे.